जळगावातील महिलेची ८० हजारात फसवणूक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । खंडेराव नगरात राहणाऱ्या गृहिणीकडून पैसे घेवून देखील किचन ट्रॉलीचे काम न करता कामगाराने ८० हजार रूपये घेवून फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की,  कलाबाई नारायण शिरसाठ (वय ४०, रा. खंडेरावनगर) यांचे घरी किचन ट्रॉलीचे काम करायचे होते. त्यासाठी त्यांनी जितेंद्र सुरेश भावसार (रा. अयोध्यानगर) याला १६ जुलै  २०२१ रोजी ८० हजार रुपये दिले. परंतू कामगार भावसार याने प्रत्यक्ष कामास सुरूवात केली नाही. कलाबाई यांनी वेळोवेळी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर कलाबाई यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भावसार याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Protected Content