ट्रक उलटल्याने ८० मेंढयांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात ट्रक पलटून झालेल्या अपघातात ८० ते ९० मेंढ्या दगावल्या. ही घटना मालेगाव -छ. संभाजीनगर महामार्गावर ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. राजस्थान येथून २४० मेंढ्या हैदराबादकडे घेऊन जण्यात येत होत्या.

घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. यामध्ये चालक चत्तरसिंग रावत (वय ४६) व त्याचा सहकारी इरफान कुरेशी किरकोळ जखमी झाले. मात्र, ८० ते ९० मेंढ्या दगावल्या. ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.

Protected Content