अलिबागमधील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई वृत्तसंस्था । ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पाहणी केली. या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह हेही रोरो बोटीने अलिबागला दाखल झाले. या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी या ठिकाणी नुकसानीची पाहणी केली. तसेच पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पाहणी केली. यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते.

Protected Content