धनराज पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान प्रदान

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिचर्डे येथील रहिवासी तथा पत्रकार धनराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्काराने पिचर्डे येथील पर्यावरण प्रेमी,निसर्ग मित्र व पत्रकार धनराज भिकन पाटील यांना निसर्ग मित्र समिती कडुन छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण पुरस्काराने नुकतेच सम्मानित करण्यात आले.  धनराज पाटील यांचे सामाजिक,शैक्षणिक, कृषी व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे पर्यावरण दिनानिमित्ताने व निसर्ग मित्र समितीचा वर्धापन दिनी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

धुळे येथील पद्मश्री टॉवर हॉल येथील भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी,  महापौर सौ प्रतिभाताई  चौधरी, धुळे जिल्हा परिषद चे अध्यक्ष सौ अश्वीनीताई पाटील मँडम,मुख्य वन संरक्षक अधिकारी दिगंबर  पगार,हस्ती बँकेचे चेअरमन वृक्ष मित्र कैलास जैन, राष्ट्रवादी चे धुळे शहर जिल्हा अध्यक्ष रणजीत राजे भोसले, आदर्श गृप चे चेअरमन महेंद्र विसपुते, निसर्ग मित्र समिती चे राज्य उपाध्यक्ष आर. डी. आबा पाटील, राज्य उपाध्यक्ष आदर्श शेतकरी सुभाष बिंदवाल,, राज्य महासचिव संतोषराव पाटील,जिल्हाध्यक्ष डी. बी, पाटील, संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, जिल्हा सचिव विश्वासराव पगार ,नियोजन समिती चे अध्यक्ष अमृतराव पवार, सचिव देविदास भदाणे, कार्याध्यक्ष शशिकांत पाटील,उपाध्यक्ष विलासराव देसले आदी उपस्थित होते.

 

यावेळी धनराज पाटील यांच्या सोबत पिचर्डे येथील मा. पो.पाटील हेमराज महाजन, पिचर्डे या.उपसंरपच विनोद बोरसे,विकासो.चेअरमन हेमराज पाटील,व्हा.चेअरमन प्रविण कुंभार,मा.उपसंरपच विजय महाजन, पिचर्डे उपसरपंच दिपक महाजन, बात्सर चे पत्रकार विनोद पाटील, पिचर्डे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माधव पाटील, पाचोरा कोर्टाचे लिपीक दिपुराजे पाटील, आदर्श शेतकरी राजेंद्र पाटील, भुषण येवले, रितेश सोनवणे,ज्ञानेश्वर बोरसे, कैलास निकम हे उपस्थित होते. धनराज पाटील यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

Protected Content