नगरदेवळा ग्रामपंचायतीसाठी ६७% मतदान !

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ६७% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण १२  हजार ८२६ पैकी ८ हजार ५७९ इतके मतदान झाले. 

सहा प्रभागातील सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत  तब्बल ३९ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद झाले. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. परंतु मतदान प्रक्रियेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची जेवणाची कुठलीच व्यवस्था झाली नसल्याने प्रस्तुत कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला. यासंदर्भात उमेदवार प्रतिनिधींनी नायब तहसीलदार (निवडणूक) संभाजी पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शासन स्तरावरून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यात याचा समावेश असल्याचे सांगितले. तर असा कुठलाही भत्ता आम्हांला मिळाला नसल्याचे कर्मचारी यांनी सांगितले. निवडणुकीसाठी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे यांच्या देखरेखीखाली नगरदेवळा औट पोस्टच्या पोलिस बांधवांनी चोख  बंदोबस्त ठेवला.

 

Protected Content