चैतन्य तांड्यातील दंडात्मक कारवाईतून ठेंगेंना ५० टक्के रक्कम सुपूर्द

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पाश्वभूमीवर चैतन्य तांडा व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विना मास्क धारकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून ५० टक्के रक्कम चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सुपूर्द करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई केली. सदर कारवाई हि विराम लॉन्स जवळील बायपासला  करण्यात आली. ग्रामपंचायतीने केलेल्या दंडात्मक कारवाईतून एकूण ४२,४०० रूपये महसूल प्राप्त झाल्याने त्यातील पन्नास टक्के रक्कम २१,२०० रूपये ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुरुवारी रोजी सुपूर्द करण्यात आले. दरम्यान ग्रामपंचायतीने याआधीही धडाकेबाज केलेल्या कारवाईतून ५० टक्के रक्कम १५, ५३५ रूपये हे ग्रामीण पोलीस स्थानकाला सुपूर्द करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत ग्रामीण पोलीस स्थानकात केलेल्या कारवाईतून ३६,७३५ रूपये जमा करण्यात आले आहेत. सदर रक्कम हे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कैलास जाधव यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना सुपूर्द करण्यात आले आहे. 

यावेळी चैतन्य तांडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कैलास जाधव, सरपंच अनिता दिनकर राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, माजी सरपंच साईदास जाधव, करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, मधूकर राठोड, अनिता चव्हाण, संदीप पवार, उदल पवार आदी उपस्थित होते. सदर कारवाई हि पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज नाईक, महाजन, देविदास पाटील, मुंन्शी व प्रेम राठोड आदींनी केली.

 

Protected Content