तरूणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या ५ जणांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील अरिहंत जैन बेकरीजवळ जुन्या वादातून कुसुंबा येथील एका तरूणाला चॉपर, लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाचही आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र बाबुराव पवार वय ३६ हा तरूण जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे वास्तव्याला आहे. त्याचा चुलत भाऊ राजेश जगराम पवार याने गावातील काही जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून रविवारी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाता रविंद्र पवार हा एमआयडीसीतील अरिहंत जैन बेकरीजवळून जात असतांना योगेश दिपक पाटील, सागर अशोक कोळी, अक्षय शांताराम कोळी, अजय बापू परधी आणि भारत कारभारी चांदेाडे उर्फ बंटी गुजर सर्व रा. कुसुंबा ता.जि.जळगाव यांनी रस्ता आडविला. पाचही जणांनी चॉपर, लोखंडी रॉड आणि दगडांनी रविंद्र पवार याला शिवीगाळ करून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Protected Content