Home आरोग्य पहूर येथे पाच जण पॉझिटीव्ह; डॉक्टरची कोरोनावर मात

पहूर येथे पाच जण पॉझिटीव्ह; डॉक्टरची कोरोनावर मात

0
31

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । येथे आज पाच नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून आधी बाधीत झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍याने या विषाणूवर मात केली आहे.

पहूर येथे आज ५ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. यात पहूर पेठ येथील ४ जण तर पहूर कसबे येथील १ जण अशा एकूण ५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, पहूर ग्रामीण रुग्णालयातील तीन वैद्यकीय अधिकारी बाधित झाले होते. त्यापैकी एका वैद्यकीय अधिकार्‍याने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून ते आपल्या घरी परतले आहेत. त्यांचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी स्वागत केले.


Protected Content

Play sound