फेसबुकने डिलीट केले तब्बल 5.4 अब्ज अकाउंट

facebook

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सोशल मीडियातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 5.4 अब्ज अकाउंट डिलीट केले आहेत. डिलीट केलेले हे अकाउंट फेक अकाउंट होते, असे फेसबुककडून सांगण्यात आले.

 

गेल्या वर्षीही याच कालावधीत फेसबुकने फेक अकाउंट हटवले होते. त्या तुलनेने यावर्षी हटवण्यात आलेल्या फेक अकाउंटच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. याशिवाय बाल शोषण संबंधित जवळपास 1.16 कोटी पोस्ट फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवले आहेत. याशिवाय फेसबुक टीमने 7.5 लाख पोस्ट इन्स्टाग्रामवरुनही हटवल्या आहेत. तब्बल 5.4 अब्ज फेक अकाउंट फेसबुकने डिलीट केले आहेत. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर महिन्यादरम्यान कंपनीने हे अकाउंट डिलीट केलेत. याशिवाय बाल शोषण आणि आत्महत्येसंदर्भात जवळपास एक कोटी फेसबुक पोस्ट देखील हटवल्या आहेत. वेबसाइटच्या लेटेस्ट कंटेंट मॉडरेशन रिपोर्टमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.

Protected Content