जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँकतून बोलत असल्याचे सांगून शहरातील एका डॉक्टराला ४९ हजाराची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील जोशी पेठ येथे राहणारे डॉक्टर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वैद्यकीय सेवा देवून आपला उदरनिर्वाह करतात. १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांना ८११४१७५१७३ क्रमांकावरून अनोळखी महिलेचा फोन आला. आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्या बँक खात्यातून ट्रॅन्झॅक्शन होत आहे. ते बंद करावे लागेल. तुम्ही बंद करणार नाही तर दर महिन्याला तुमच्या खात्यातून ४९३१२ रूपये भरावे लागतील असे सांगून डॉक्टरला ओटीपी नंबर बोलण्यात फसवणूक करून विचारून घेतला. त्यानंतर लागलीच डॉक्टरच्या खात्यातून ४९ हजार ६१२ रूपये कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी ८ मे रोजी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.