संत मीराबाई नगरात सांडपाण्याचा निचरा होत नसल्यांच्या तक्रारी; उपमहापौर पाटील यांची भेट (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील संत मीराबाई नगरात सांडपाण्याच्या निचरा होत नसल्यामुळे गटारीतील पाणी रस्त्यावर येत आहे. गटारींची दुरावस्था झाल्याची समस्या बऱ्याव वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे नागरीकांचे पावसाळ्यात हाल होत आहे. नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत आज सोमवारी सकाळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट घेवन समस्यांची पाहणी केली.

 

संत मीराबाई नगरात गेल्या अनेक महिन्यांपासून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याच्या तक्रारी महापालिकेत आल्या होत्या. पावसाळ्यात संत मीराबाई नगर व परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या भागातील गटारीची नियमीत सफाई होत नसल्यामुळे ही अडचण उदभवली. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तक्रारींची दखल घेत आज सोमवारी सकाळी संत मीराबाई नगरात जावून गटारींची परिस्थिती पाहून प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधला व संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर समस्या सोडविण्याच्या सुचना दिल्यात.  उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, या भागातील रस्ते हे पावसाळ्यानंतर होणार आहेत. तत्पूर्वी गटारींची नियमितपणे सफाई करण्यात येईल. अगदी दोन दिवसात या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यासाठी आपण सोबत बांधकाम, आरोग्य आदी खात्यांचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सोबत घेऊन आलो असून त्यांना योग्य ते निर्देश देण्यात आल्याची माहिती देखील उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी याप्रसंगी दिली. यात या परिसरामध्ये नियमितपणे साफ-सफाईदेखील करण्यात येणार असून याबाबतचे सफाई कर्मचार्‍यांना निर्देश दिल्याचेही ते म्हणाले.  यावेळी शहर अभियंता अरविंद भोसले, नगररचना सहाय्यक कार अतूल पाटील, आरोग्य निरीक्षक अत्तरदे, श्री पवार आदी उपस्थित होते.

Protected Content