पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील न्यायालयात ०३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते, सदर लोकदालतीचे पॅनल प्रमुख तसेच प्रमुख न्यायाधीश श्री. एम. एस. काझी हे होते तर पॅनल पंच म्हणून अॅड. पराग ए. शिरसमणे यांनी काम पाहिले. या लोकअदालतीत न्यायालयात दाखल असलेली दिवाणी २१२ प्रकरणे ठेवली होती त्यापैकी ६ प्रकरणे निकाली निघून २ लाख २० हजार ९४९ रुपये तडजोडीअंती वसूल झाले तर फौजदारी २५५ प्रकरणे ठेवली होती त्यापैकी १५ प्रकरणे निकाली निघून १५ लाख ८१ हजार ६२१ रुपये तडजोडीअंती वसूल झाले असे एकूण ४६७ पैकी २१ प्रकरणे निकाली निघून १८ लाख २ हजार ५७० रुपये तडजोडीअंती वसूल झाले.
सदर लोकअदालतीत बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आय.डी.बी.आय. बँक, बीएसएनएल या विभागांनी देखील आपली दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. सदर दाखल पूर्व प्रकरणात एकूण ११४१ प्रकरणे ठेवली होती त्यापैकी २३ प्रकरणे निकाली निघून त्यात ३१ लाख ८५ हजार ४७९ रुपये तडजोडीअंती वसूल झाले आहेत.असे न्यायालयात दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे मिळून एकूण ठेवलेले १६०८ प्रकरणांपैकी ४४ प्रकरणे निकाली निघून त्यात एकूण ४९ लाख ८८ हजार ४९ रूपये वसूल झाले.यावेळी जेष्ठ विधितज्ञ अनिलकुमार देशपांडे, ए. आर. बागुल, आनंदराव पवार, अॅड. ए. डी. पाटील, दत्ताजी महाजन, ए डी कश्यप, वकील संघाचे अध्यक्ष अड. प्रशांत ठाकरे, सचिव अड. गणेश मरसाळे, अड. तुषार अशोक पाटील, वाय एन मोरे, तुषार के पाटील, सतीश पाटील, भुषण माने, एच एम कुलकर्णी, अकील पिंजारी, वेदव्रत काटे, सतीश एन पाटील, श्रीमती.कृतिका आफ्रे, स्वाती शिंदे, विद्या सुर्यवंशी, पुनम पाटील, पोलीस केस वॉच यासह लोक अभिरक्षक कार्यालय, जळगांव येथील अॅड. हर्षल शर्मा व अॅड. सागर जोशी व वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.
सदर लोक अदालत यशस्वितेसाठी न्यायालयीन कर्मचारी श्री. बी. एम. भोसले, विलास ठाकुर, पंकज महाजन, एम. एस. पाटील, एम. एस. महाजन, एम. टी. सोनवणे, टी. एस. पवार, चैत्राम पवार, एस. एम. धनगर, डी. पी. देशपांडे आदि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. पक्षकार, बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक, बँक अॉफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आय.डी.बी.आय. बँक, बीएसएनएल आदि विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते