जिल्ह्यातील प्रकल्पात ४४.२१ टक्के उपयुक्त साठा

अंजनी प्रकल्पातून सोनवद रोटवदसाठी बिगरसिंचन आवर्तन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे. परंतु गेल्या महिन्या दीड महिन्यापासून तप्त उन्हामुळे वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील जिल्ह्यातील बहुताश प्रकल्प पातळी खाली गेली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पात ४४.२१ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाने दिली .

ग्रामीण भागात मे महिन्यात पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागात नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु यावर्षी समाधानकारक पावसामुळे एप्रिल अखेर पाणीटंचाई जाणवली नाही. जिल्ह्यातील चार तालुक्यात ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जिल्ह्यातील सध्यस्थितीत मोठ्या तसेच मध्यम प्रकल्पात ४४.२१ % उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पापैकी गिरणा प्रकल्पावर 4 ते 5 तालुके अवलंबून आहेत. या तालुक्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे बिगर सिंचनासाठी १५०० क्युसेक पाण्याचे आवर्तन १ मे रोजी सोडण्यात आले होते. तर २१ रोजी दुपारी अंजनी प्रकल्पातून सोनवद आणि रोटवदसह अन्य ग्रामीण भागासाठी ३७० क्युक्सेक बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात आले असून रविवारी सायंकाळ नंतर ते बंद केले जाणार असल्याचेही गिरणा पाटबंधारे विभाग प्रशासन अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.

जिल्ह्यातील प्रकल्पात ४४.२१ % उपयुक्त जलसाठा

यावर्षी जिल्ह्यातील मोठ्या मध्यम लघु अशा सर्व ९६ प्रकल्पात सध्य स्थितीत ६३१.१३ दलघमी अर्थात ४४.२१ % उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी केवळ ५३२.४३ दलघमी म्हणजेच केवळ १८.८० % उपयुक्त जलसाठा होता.

प्रकल्प  उपयुक्त साठा          टक्के     गतवर्षी उपयुक्त साठा       टक्के

हतनूर    १०९.८० दलघमी      ४३.०६ %  ४५.८०                        १७.९६ टक्के

गिरणा    २००.१५                 ३८.२३ %   २०१.८०                      ३८.५४ %

वाघूर      १८४.८८                  ७४.३८ %  १६७.७६                      ६७.५० %
तर मध्यम प्रकल्पात मन्याड १२.८९, बोरी १२.९९, भोकरबारी २९.९३, सुकी ६०.४५, अभोरा ५९.४९, अग्नावती १२.२७, तोंडापूर ३९.५३, हिवरा ६.०८ , मंगरूळ ४२.२५, बहुळा ३१.९९, मोर ६५.५३, अंजनी ३८.८६, गूळ ३४.५१ टक्के उपयुक्त जलसाठा लघु प्रकल्पात असून आजचा उपयुक्त जलसाठा ४४.२१% आहे तर गतवर्षी याच दिवशी प्रकल्पात केवळ ३७.३० % उपयुक्त जलसाठा होता अशी माहिती गिरणा प्रकल्प प्रशासनाने दिली आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.