भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका ठेकेदाराला कंत्राट देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४० लाख ९६ हजार ९२० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना २३ डिसेंबर रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील शांती नगरात गौरव अनिल मनवानी वय २५ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रेल्वे विभागात ठेकेदारीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, १४ डिसेंबर रोजी त्यांना श्रीकांत मिश्रा असे सांग सांगणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने फोन करून सांगितले की, तुम्हाला लोखंडी सळईचा कंत्राट देण्याचे आमिष दाखविले., त्यानंतर १४ ते २३ डिसेंबरच्या दरम्यान वेगवेगळ्या स्वरूपातून एकुण ४० लाख ९६ हजार ९२० रूपयांची ऑनलाईन पध्दतीने पैसे स्विकारले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गौरव मनवानी यांनी बुधवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीकांत मिश्रा असे नाव सांगणाऱ्या मोबाईलधारकारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश गोराडे हे करीत आहे.