जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस ९५ योजनेत ७५ लाख पेन्शनर केंद्र, राज्य सरकारचे उपक्रम, सहकार क्षेत्र, परिवहन खाते वीजमंडळ व औद्योगीक कारखाने तसेच मीडिया यांच्याकडून ४१७ तर काही जणांकडून ५४१ तसेच एक हजार २५० प्रतीमाह पूर्ण सेवा काळात पगारातून कपात केले. मात्र, त्यांना सरासरी पेन्शन फक्त एक हजार १७० रुपये पेन्शन प्रतीमाह दिली जाते. यात एक रुपयाची देखील वाढ झाली नाही. त्यामुळे देशभरातील ईपीएस पेन्शनर्स दिल्ली संसद भवनावर ता. सात डिसेंबर रोजी मोर्चा नेणार आहेत.
अध्यक्ष अरविंद भारंबे यांचें मार्गदर्शना खाली सागर पार्क येथे कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली असून त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, आजच्या महागाईच्या काळात पेन्शनर दांपत्यांने जगायचे कसे? याची कल्पना न केलेली बरी. न्युनतम पेन्शन एक हजार रुपयांनी वाढवून साडेसात हजार महागाई भत्यासह देण्यात यावा. पती-पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा, कुठलाही भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन लागू करावी व या योजनेत सहभागी नसणारे सेवानिवृत्त कर्मचा-यास दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मंजूर न करता, कर्मचारी भविष्यनिधी संघटन व केंद्र सरकार पेन्शनरवर अन्याय करीत आहेत.
कार्यकारणीच्या बैठकीला रमेश नेमाडे. ऊपाध्यक्ष,संजीव खडसे कार्याध्यक्ष,डी. एन.पाटील. सचिव, हरी एन.व्यवहारे राज्य उपसचिव,मिठाराम सरोदे भुसावळ तालुका अध्यक्ष, कौतिक किरंगे, नारायण नेवे,संतोष पाटील,आर टी. थाटे,एम झेड जैन,पी एम पाटील,टी जे पगारे,अशोक रुपा कोळी,शांतीलाल पाटील,सुरेश चौधरी,बी व्ही पवार, जडे चंद्रकांत, बाळासाहेब तोडकर,ए ए पाटील, बिराडे चंदन, अशोक जडे, रमेश सोनार, बाळासाहेब खराडे, जे.डी ठाकरे,डी एन विखे,व्हि एम ठाकूर व सर्व सभासद बांधव उपस्थित होते.
जळगाव दिल्लीला रेल्वेने जाणार
राष्ट्रीय संघर्ष समिती मागील सात वर्षापासून वरील मागण्या मंजूर करण्यासाठी सातत्याने आंदोलन करून संघर्ष करीत आहे. अत्यंत कमी पेन्शन व वैद्यकीय सुविधा अभावी दररोज दोनशे ते तीनशे पेन्शनर या जगाचा निरोप घेत आहे. यामुळे पेन्शनरमध्ये मोठा असंतोष वाढत आहे. यासाठी वरील मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आंदोलन करून ता. सात डिसेंबर रोजी नवी दिल्ली रामलिला मैदानावर आंदोलन करून संसद भवनावर मोर्चा नेणार आहेत. जळगाव येथून दिल्ली जाण्यासाठी ता. सहा डिसेंबर रोजी निघणार्या या रेल्वेला दोन जादा जनरलचे डबे लावण्यात येणार आहेत.