कत्तलीसाठी नेणाऱ्या ४ गुरांची सुटका, चालकावर पाचोरा पोलीसांची कारवाई


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरालगतच्या मोंढाळा रोडवर कत्तलीसाठी वाहनातून गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी बुधवारी, १८ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तात्काळ कारवाई करत (एमएच ४७ वाय ९०७६) या वाहनावर छापा टाकला. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी पोलिसांनी वाहनचालक इरफान टकारी (वय ३०, रा. कुरबान नगर, पाचोरा) याला वाहनाची कागदपत्रे आणि गुरांच्या वाहतुकीची परवानगी विचारली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील ताराचंद पाटील यांनी तात्काळ कारवाई करत वाहन ताब्यात घेतले आणि त्यातील चार गोरांची सुटका केली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात इरफान टाकरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील करत आहेत.