धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथे घराचा मागच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याची घटना रविवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नीलकंठ विश्वनाथ कोळी (वय-३०) रा. चिंचपूरा ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. शनिवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता सर्व कुटुंबीय घरात झोपले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा मागच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरात ठेवलेले रोख रक्कम आणि सोन्याचे चांदीचे दागिने असा एकुण ३९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार रविवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आला. दरम्यान निळकंठ कोळी यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी हे करीत आहे.