जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे पोलीस प्रशासनातर्फे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३५ तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मार्गी लावण्यात आले आहे अशी माहिती, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील प्रत्येक पोलीस विभागीय क्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन करून नागरीकांच्या तक्रारी त्वरीत मार्गी लावाव्यात असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहे. दर महिन्याच्या पहिल्या शनीवारी जनता दरबारचे आयोजन करण्याच्या देखील सुचना देण्यात आले आहे. या अनुषांगाने जळगाव पोलीस विभागातील जळगाव शहर, जिल्हापेठ, शनीपेठ, एमआयडीसी, रामानंद नगर पोलीस ठाणे आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांसाठी पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे शनिवार २ जुलै रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकुण ३५ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिली.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, नागरीकांच्या कौटुंबिक, शेतीचा वाद, सामाईक भिंतचा वाद, शेतातच्या बांधावरील वाद यासह कौटुंबिक वाद देखील याठिकाणी तातडीने सोडविण्याच्या सुचना संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. महिन्यांच्या पहिल्या शनिवारी जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असून नागरीकांनी आपल्या तक्रारी दाखल करावे. जेणे करून तक्रारींचे निवारण लवकरात लवकर करण्यास मदत होईल असे आवाहन देखील पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी केले आहे. याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.