पारोळा प्रतिनिधी । ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. त्याअनुषंगाने 325 नामनिर्देशन पत्र हे आज दाखल झाले असून 16 ग्रामपंचायतीसाठी आद्यप एकही अर्ज दाखल करण्यात आलेले हे विशेष आहे.
दरम्यान तालुक्यात 10 ते 12 ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. आज तहसील कार्यालयात यात्राचे स्वरूप प्राप्त झाले होते. तालुक्यातील 83 ग्रामपंचायत पैकी 58 ग्रामपंचायत साठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रिया सुरू आहे. 188 प्रभाग मधून 506 सदस्य हे निवडुन द्यावयाचे आहेत. या 58 ग्रामपंचायत इच्छुक सदस्य पदासाठी तहसील कार्यालय आवारात 30 टेबल वर नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज 325 इच्छुकांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. काल ता 28 रोजी 46 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. आज अखेर एकूण संख्या 374 इतकी झाली आहे.
ऑनलाईन सेंटरवर आजही गर्दी
ग्रामपंचायत सदस्य इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट काढून तो संबंधित निवडणूक अधिकारीकडे सुपूर्द करावयाचा आहे. त्यासाठी जुन्या तहसील कार्यालय बाहेरील विविध ऑनलाईन सेंटरवर इच्छुकांची आज देखील मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. अनेक स्त्री पुरुष, लहान मुले घेऊन सेंटर व आजू बाजूला बसलेले व उभे दिसून येत होते.