एकनाथराव खडसे उद्या ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता कमी

मुंबई प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने ते उद्या दिनांक ३० रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

न्यूज-१८ लोकमत या वाहिनीने एकनाथराव खडसे हे उद्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे वृत्त दिले आहे. यानुसार एकनाथराव खडसे यांना मिळालेल्या नोटीसमध्ये त्यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आलेले आहे. यानुसार खडसे हे मुंबई येथे दाखल झालेले आहेत. तथापि, ते उद्या चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथराव खडसे यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. यामुळे ते उद्या हजर राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे असे न्यूज-१८ लोकमत वाहिनीच्या वृत्तात म्हटले आहे.

Protected Content