यावलहून मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणाऱ्या लाडक्या बहीणींसाठी सोडण्यात आल्या ३० बस

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल एसटी महामंडळाच्या आगारातुन आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या भेटी येत असुन यावल आगाराच्या वतीने बहीणींना मुख्यमंत्री यांच्या भेटीला जाण्यासाठी सुमारे ३o एसटी बसेस सोडण्यात आल्या आहे.

जळगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज १३ ऑगस्ट रोजी येत आहे. त्यांच्या उपस्थित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्य शासनाची महीलांना भागिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातुन सश्वक्तीकरण अधिकार मिळून देणाऱ्या कार्यक्रमाची सुरूवात त्यांच्या हस्ते होणार असुन , याकरीता मुख्यमंत्रींच्या भेटीला लाडक्या बहीणांना जाता यावे यासाठी यावल एसटी आगारातुन यावल आगाराच्या बस स्थानकातुन ३० बसेसची व्यवस्था करण्यात आली आली.

यावल आगारातुन १० भुसावळ आगारासाठी १०व १० एसटी बसेस या बोदवडहुन जाणाऱ्या बहीणींसाठी अशा एकुण ३० बसेस यावल आगारातुन सोडण्यात आल्या असुन यातुन सुमारे १२०० हुन अधिक लाडक्या बहीणी प्रवास करणार आहे. यावल पंचायत समितीच्या वतीने जळगाव जाणाऱ्या बहीणींसाठी बिस्कीट व आदि नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची बाटल्या वितरीत करण्यात आल्या. याप्रसंगी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावलच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हबीब तडवी यांच्या यावल एसटी आगार वाहतुक नियंत्रक दिलीप ठाकरे यांच्यासह आदि पंचायत समितीचे अधिकारी कर्मयारी , पंचायत समितीचे विविध पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येत नागरीक उपस्थित होते .

Protected Content