जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरत विधानसभा निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी २८ इच्छुक उमेदवारांनी ४५ अर्ज घेतले आहे. अशी माहिती जळगाव शहर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
जळगाव शहर विधान सभेच्या निवडणूकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणूक कार्यालयात इच्छुकांनी पहिल्याच दिवशी अर्ज विकत घेण्यास सुरूवात केली आहे.
यात पहिल्यांच दिवशी पहिला अर्ज काँग्रेसतर्फे गोकुळ रमेश चव्हाण, हिंदुस्थान जनता पार्टी सुरेश पांडूरंग पाटील, अपक्ष सचिन विष्णु घोडेस्वार, अपक्ष पंकज वासूदेव बोरोटे, अपक्ष प्रदीप शंकर आव्हाड, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी शरीफ शफी बागवान, अपक्ष रमेश पुंडलिक खोडपे, अपक्ष भरत पंढरीनाथ सपकाळे, अपक्ष शेख आबिद शेख नासिर, अपक्ष विकास दिलीप नेहते, अपक्ष दिपक अशोक तळेले, अपक्ष मयुर चंद्रकांत कपसे, अपक्ष पंकज शिवाजी पवार, हिंदु महासभा भुषण नितीन सुर्यवंशी, अपक्ष गोकुळ रामचंद्र पाटील, अपक्ष राजेश जगन्नाथ जाधव, अपक्ष तौसिफ साबिर बागवान, अपक्ष मेघनाथ आत्माराम सूर्यवंशी, अपक्ष तुषार विष्णू कुलकर्णी, अपक्ष मोबिन महेमूद पटेल, अपक्ष महेश लक्ष्मीनारायण वर्मा, काँग्रेस आय राजेश गजानन मोरे, अपक्ष विनोद दामू अढाडके, अपक्ष अविनाश रविंद्र चौधरी, अपक्ष मनोहर रूपचंद शिंदे, अपक्ष वसंत शंकर कोलते, अपक्ष प्रविण जगन सपकाळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.