बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधून २१ हजारांची रोकडची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना एका महिलेच्या पर्सची चैन उघडून २१ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

मनिषा दिनेश पाटील वय ३५ रा. वाघ नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता त्या जळगाव येथील नवीन बसस्थानकात आलेल्या होत्या. त्यावेळी अमळनेर शिंदखेडा बस क्रमांक (एमएच १४ बीटी १३५१) या बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यातून २१ हजार रूपयांची रोकड काढून चोरी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र ठाकरे हे करीत आहे.

Protected Content