फैजपूरात हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत स्वांतत्र्य सैनिकांच्या घरावर लावला तिरंगा

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने व पिंटू भाऊ राणे मित्र परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहनाला प्रतिसाद देत हर घर तिरंगा अभियान उत्सवात साजरा करण्यात आला.

 

शनिवार दि. १३  ऑगस्ट रोजी  पेहेड वाडा येथे भारत मातेच्या प्रतिमेस पूजन व वंदन करून फैजपूर शहरातील स्वातंत्र्य सैनिक याच्या घराला तिरंगा ध्वज लावून आभियानात सुरुवात करण्यात आली.  स्व. दयाराम रेवा चौधरी, स्व. ओंकार खंडू चौधरी, स्व. विठ्ठल जोशी, स्व. वामन विठू भारंबे, स्व. धर्मा तापीराम चौधरी, स्व. पी..वाय. चौधरी, स्व. काशिनाथ माळी, स्व. चिमण आसाराम होले, स्व. रामचंद्र परशुराम चौधरी, स्व. रघुनाथ दयालदास वाणी, स्व. पुरुषोत्तम नाटू चौधरी, स्व. त्रंबक ओंकार तळेले, स्व. ताराचंद दालवाले, स्व. सुकलाल सिंह परदेशी यांच्या घराला तिरंगा ध्वज लावून पेहेड वाडा, भारंबे वाडा, त्रिवेणी वाडा, देविवाडा,  सराफ गल्ली,  लक्कडपेठ, कासारगल्ली, धोबी वाडा, तूप बाजार, बाहेरपेठ, शिव कॉलनी,  शिवाजी नगर, सुतार गल्ली याठिकाणी जाऊन घरोघरी तिरंगा ध्वज लावण्यात आले. दि. १३  ते १५  ऑगस्ट दरम्यान “घरोघरी तिरंगा” अर्थात “हर घर तिरंगा” या अभियानात सर्वांनी सामील होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवला.  याप्रसंगी मा. नगराध्यक्ष पिंटू राणे, भाजपा फैजपूर शहराध्यक्ष अंनता नेहेते, भाजपा तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, बंडू  सरोदे ,राकेश जैन , गोटू भारंबे , पिंटू तेली, संजय महाजन , भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे, रामा होले, शाम भंगाळे, टी. न  चौधरी, चावदास सराफ, किरण चौधरी, मनोज चौधरी, मनोज सराफ, पराग पाटील ,भूषण चौधरी ,   संकेत तांबट,  ईश्वर इंगळे, प्रशांत मिस्तरी, अक्षय परदेशी, हेमराज चौधरी , राकेश चौधरी, केतन भंगाळे, रितेश चौधरी, मोहन होले, लोकेश कोल्हे, भरत कोल्हे, गोलू चौधरी, नामदेव भंगाळे, भरत भंगाळे, पराग चौधरी, सुरज गाजरे, हिमांशू राणे, जयेश कोल्हे, प्रफुल नेते, आशिष कापडे, कुणाल चौधरी, देविदास कपले, राहुल चौधरी, स्वप्निल चौधरी, दानिश चौधरी, आदी उपस्थित होते.

Protected Content