धरणगावात शिवसेना आक्रमक : महापुरूषांच्या स्मारकांचे केले शुध्दीकरण !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव शहरातील महापुरूषांच्या स्मारकाला माल्यार्पण केले होते. शिवसेनेने आज आक्रमक भूमीका घेत शहरातील महापुरूषांच्या स्मारकांचे दूग्धाभिषेक करून शुध्दीकरण करून घेतले.

 

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटात सामिल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सत्ता स्थापन झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड झाल्यानंतर आता मंत्रीमंडळाचा देखील विस्तार झाला आहे. यात जळगाव जिल्ह्यात आमदार गिरीष महाजन आणि आमदार गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. या अनुषंगाने शनिवारी १३ ऑगस्ट रोजी कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि धरणगाव तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून धरणगाव शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते.

 

दरम्यान, कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महापुरूषांच्या स्मारकांना माल्यार्पण करण्यात आले होते. आज रविवारी १४ ऑगस्ट शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारंकांना दुग्धभिषेक करून शुध्दीकरण करून घेतले. यावेळी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Protected Content