शिवीगाळ केल्याच्या संशयावरून चालकाला लोखंडी पाईपाने मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवीगाळ केल्याच्या संशयावरून एका चालकाला तीन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने डोक्याला मारून दुखापत केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील आश्रम शाळेजवळ गुरूवारी २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवारी ३ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजता मारहाण करणारे तीन जणांवर धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जंगलू गोमा भिल वय ४० रा. चांदसर ता. धरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून खासगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. जंगलू भिल याने शिवीगाळ केल्याचा संशयावरून गुरूवार २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता चांदसर गावात राहणारे रोहीत दादा भोई, किरण गोकूळ भोई, गोकूळ सोमा भोई यांनी शिवीगाळ करतो असे बोलून हातातील लोखंडी पाईप ने मारहाण केली. या मारहाणीत जंगलू भिल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी ३ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजता जंगूल याने पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणारे रोहीत दादा भोई, किरण गोकूळ भोई, गोकूळ सोमा भोई तिघे रा. चांदसर ता. धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Protected Content