अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने २ पादचारी महिलांना चिरडले; एक ठार, दुसरी जखमी

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवैध रेती वाहतूक करणारे वाहन सामान्य नागरिकांकरता धोकादायक ठरत आहे. अनेक वेळा फक्त कारवाईचे थातूरमातूर देखावा केल्यानंतर पुन्हा एकदा हे रेती माफिया वाहतूक करणारे सक्रिय होतात. सकाळी बुलढाण्यात अशीच घटना घडली यामध्ये एक महिला जागीच ठार तर दुसऱ्या महिन्याची प्रकृती चिंताजनक आहे. आठवड्याचा विचार केला तर हा चौथा बळी म्हणावा लागेल. बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे ही वाहने भरधाव वेगात असल्याचं देखील समोर आलं आहे. अशाच एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दोन पादचारी महिलांना चिरडल्याची घटना आज सकाळी घडली आहे. तसेच वाहन चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

बुलढाणा मार्गावरील नांदुरा शहरातील कब्रस्तान जवळ एका भरधाव ट्रकने दोन महिलांना चिरडलं. यामध्ये एका महिलेचा अपघात स्थळीच मृत्यू झाला आहे. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या महिलेला खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये मृत महिलेचं नाव वनिता बोचरे, असं आहे. तर जखमी महिलेचं नाव गीता ढगे असल्याची माहिती मिळतेय. ढगे या गंभीर जखमी झालेल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. जिल्ह्यामध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. तसंच वाळू माफियांची दहशत देखील दिसून येत आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.

Protected Content