तोंडी तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा : अटकपूर्व जामीन फेटाळला

चोपडा प्रतिनिधी | येथील एका तरूणाने आपल्या पत्नीला तोंडी तिहेरी तलाक दिला म्हणून त्याच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, चोपडा येथील मुस्तफा कॉलनीतील रहिवासी रईसोद्दीन रफीयोद्दीन जहागीरदार याचा एका तरूणीसोबत जुलै २०१९ मध्ये विवाह झाला होता. तीन वर्षात त्याने आपल्या पत्नीला माहेरून पैसे आणावेत म्हणून छळ केला. यानंतर त्याने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या पत्नीला तोंडी तिहेरी तलाक देऊन तिच्या माहेरी पाठवून दिले. या अनुषंगाने संबंधीत महिलेच्या तक्रारीवरून रईसोद्दीन आणि त्याच्या आईच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रईसोद्दीन याच्या आईला चोपडा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी त्याचा अर्ज मात्र फेटाळण्यात आला आहे.

Protected Content