स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिसांना वरणगाव रोड फेकरी शिवार जुना फेकरी टोल नाका राष्ट्रीय महामार्गवर बायोडिझेलची विनापरवानगी वाहतूक करताना राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे.भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महामार्ग पोलीस मदत केंद्र पाळधी जिल्हा जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लोटेश सोनवणे, पोलीस हवालदार, अनिल सपकाळे, पोलीस नाईक हितेश पाटील, पोलीस
शिपाई श्रीकृष्ण चाटे हे पेट्रोलिंग करीत असताना भुसावळ तालुक्यातील शनिवारी ७ रोजी दुपारी १२ वाजेला जुना विक्री टोल नाक्याजवळवर टाटा सिग्मा कंपनीचा टँकर क्रमांक ( जीजे १२ बी एक्स ०४७९) संशयालाने तपासणी केली असता त्यामध्ये टँकर मध्ये बायोडिझेल चामिळून आले. सदर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ज्वलनशील द्रव्य पदार्थाची वाहतूक करण्याची कोणतीही अधिकारी किंवा प्राधिकरणाचा परवाना स्वतःजवळ नसताना आज विधानाची यंत्रणा नसताना वाहनावर ज्वालाग्रही पदार्थ सावधान असे चिन्ह किंवा शब्दात न लिहिता गैर कायदा विना पाच परवाना वाहतूक करताना टँकर मिळून आले. यामध्ये ज्वलनशील पदार्थ 35 370 मॅट्रिक टन ज्याचे बाजार मूल्य 18 लाख 94 हजार आठशे रुपये व दहाला तीनशे रुपयांचा टाटा सिग्मा कंपनीचा टँकर असा 28 लाख 95 हजार 342 रुपयाच्या एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी वाहन चालक महेंद्र कुमार रामविलास यादव व 23 पुरे दौलत पोस्ट डोह तालुका सलोन जिल्हा रायबरेली उत्तर प्रदेश वाहन मालक भावेश कुमार समतभाई उडारिया पासुदा तालुका अंजार जिल्हा गांधीधाम ,आस्था इम्पेक्स गांधीधाम गुजरात कंपनी मालकाचे नाव माहित नाही, फेनी इंटरप्राईजेस राणी तलाव रनदगाव छत्तीसगड मालकाचे नाव माहित नाही यांच्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.