यावल ( प्रतिनिधी ) : येथील तालुका शिवसेनेच्या वतीने आदिवासी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली .
दिनांक १५ नोव्हेंबर रोजी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व .जे टी महाजन व्यापारी संकुलनातील शिवसेनेच्या तालुका संपर्क कार्यालयात आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयती साजरी करण्यात आली . यावेळी उपस्थितांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून विनम्र अभीवादन केले .या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील , तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे , शिवसेना आदीवासी सेलचे तालुकाप्रमुख हुसैन तडवी , शहर उपप्रमुख संतोष खर्चे, आर के चौधरी सर ,योगेश चौधरी , सागर देवांग , मोहन कोळी, संजय शिंपी , विनायक पाटील , भरत चौधरी सर , सोनु तडवी , सागर बोरसे , सतिष पाटील , आरिष झुरकाळे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती होती.