महापालिकेच्या १४३ वाहनांचे नुतनीकरण करू नये; दीपककुमार गुप्ता यांचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिका अंतर्गत १४३ वाहनांची मुदत संपण्यात आली आहे. अश्या मुदत संपलेल्या वाहनांचे नुतनीकरण करून नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांना निवेदन देवून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत साफसफाई करण्याचा ठेका वॉटरग्रेज नावाच्या कंपनीला देण्यात आलेला आहे. या ठेकाच्या अंतर्गत महानगरपालिकेचे १४३ वाहने ठेकेदाराच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्या वाहनाच्या माध्यमातून जळगाव शहरातील साफसफाई व कचरा उचल करण्यासाठी वापर केला जातो. दरम्यान या १४३ वाहनांची फिटनेस प्रमाणपत्राची मुदत शासकीय नियमानुसार समाप्त झालेली आहे. असे होऊन देखील त्याच वाहनांची नूतनीकरण केले जात आहे, अशी वाहने रस्त्यावर चालली तर नागरिकांच्या जीविताला धोका व अपघात होवू शकतो.  यामध्ये मार्च २०२१ मध्ये २५ घंटागाड्या, एप्रिल २०२१ मध्ये ६० घंटागाडी,  डिसेंबर २०२० मध्ये ३२ घंटागाडी आणि ऑगस्ट २०२१ मध्ये  ७ कॉम्पॅक्टर अशी एकुण १४३ वाहनांची शासकीय नियमानुसार समाप्त झालेली आहे. तसेच या वाहनांची विमा आणि पीयूसी देखील समाप्त झालेली आहे. जळगाव उपप्रादेशिक परिवहन मंडळाच्या विभागाच्या वतीने अशा वाहनांची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन सामाजिक माहिती कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आले आहे.

Protected Content