काश्मीरमध्ये बसमधून १४ किलो आरडीएक्स जप्त

01 10 2019 major terror attack averted in jammu 19629986 164334207

श्रीनगर, प्रतिनिधी | भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त शोध मोहीमेला आज (दि.१) मोठे यश आले आहे. मंगळवारी एका बसमधून जवळपास १४ किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले आहे. हे आरडीएक्स जम्मूच्या बस स्टँडजवळील एका हॉटेल जवळून जप्त करण्यात आले आहे. १४ किलो आरडीएक्स सापडल्याने हा मोठा घातपात घडवण्याचा कट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

आज सकाळी ५.०० वाजता बिलावरहून बस सुरू झाली होती. या दरम्यान एका महिलेसोबत एक व्यक्ती बस चालकाच्या जवळ आला. थोड्या वेळापर्यंत बस चालकासोबत चर्चा केल्यानंतर दोघांनी ती बॅग बस कंडक्टर यांच्याकडे सोपवली. कंडक्टरने ती बॅग बसच्या सीटखाली ठेवून दिली. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या माहितीच्या आधारे बसचा पाठलाग करण्यात आला. ज्यात जम्मू येथील मॉडेल अकादमीजवळ पाठलाग करून ही बस पकडण्यात आली. बसची तपासणी करण्यात आल्यानंतर या बसमध्ये तब्बल १४ किलो आरडीएक्स आढळून आले आहे. पोलिसांनी बस चालक व कंडक्टरसह बसला ताब्यात घेण्यात आले आहे. बस (क्र.जे.के.०२, ए.यू. ७१६७) या बसमधून हे आरडीएक्स नेण्यात येत होते. बस मालक सुभाष, बस चालक कुलदीप आणि बस कंडक्टर मोहिंदर या तिघांची चौकशी करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकातील काही सदस्य प्रवासी म्हणून बसमध्ये बसले. या दरम्यान कंडक्टर व चालकाला याची पुसटशीही कल्पना नव्हती. बस चालक व कंडक्टर यांना रंगेहात पकडणे हा त्यांचा उद्देश होता. बस जम्मूत पोहोचल्यानंतर पोलिसांनी बराचवेळ बॅग घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची वाट पाहिली. त्यानंतर पथकाने बस चालक व कंडक्टरला अटक केली. राज्यातून विस्फोटक साहित्य जप्त करण्याचे हे दुसरे प्रकरण आहे. काही महिन्यापूर्वी एका गावातून असेच विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आले होते. अवैध शस्त्रांचा कारखाना चालवल्याप्रकरणी एका व्यक्तीला लाहडी गावातून अटकही करण्यात आली होती.

Protected Content