नांद्रे येथे पोलिसांची कारवाई; दारूची हातभट्टी उध्वस्त

चाळीसगाव, प्रतिनिधी  तालुक्यातील नांद्रे शिवारात अवैध दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती मेहूणबारे पोलिसांच्या हाती लागताच सदर ठिकाणी  छापा टाकून ७६ हजारांचा मुद्देमाल जागीच उध्वस्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नांद्रे येथील मण्याड नदीजवळील झाडा – झुडपात कच्चे- पक्के रसायनांची अवैधरीत्या दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती सोमवार, २१ रोजी पोलिस निरीक्षक पवन देसले यांना मिळाली. त्यावर लागलीच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून ६०,००० हजार किंमतीचे २०० लि. कच्चे रसायन, १४,००० हजार किंमतीचे ४०० लि. पक्के रसायन व २,४०० रूपये किंमतीचे ६० लि. तयार दारू असे एकूण ७६,४०० रूपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आले. या ठिकाणाहून गणेश बन्सी सोनवणे (रा. नांद्रे ता. चाळीसगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. हि कारवाई पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मिलिंद वामन शिंदे, पोहेकॉ संजयकुमार हिलाल पाटील व पोकॉ गोरख वाल्मिक चकोर आदींनी केली. पोकॉ शैलेंद्र अशोक माळी यांच्या फिर्यादीवरून मेहूनबारे पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content