मोफत विकारमुक्ती शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी । येथील विश्‍वमंगल योग निसर्गोपचार केंद्र व सकल लेवा महिला मंडळातर्फे आयोजीत मोफत विकारमुक्ती शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. आज सकाळी या शिबिराचा समारोप करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, जागतिक योग दिनानिमित्त विश्‍व मंगल योग निसर्गोपचार केंद्र,जळगाव व सकल लेवा महिला मंडळतर्फे स्लिप डिस्क, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, संधिवात, इत्यादी विकारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.

दिनांक – १६ ते २२ जुन दरम्यान दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत जळगाव येथील तज्ज्ञ योग पंडित प्रा. सौ. चित्रा दिलीप महाजन तसेच योग शिक्षिका सौ. मनिषा गोविंद चौधरी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. आज सकाळी या शिबिराचा आज समारोप झाला.

सौ. सारिका पाटील,चित्रा महाजन, नीलकंठ चौधरी व गोविंद चौधरी यांनी केलेल्या शंखध्वनी आणि दीप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ. चित्रा महाजन यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे उद्घाटन थोरवी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. निला संजय चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले होते. अ‍ॅड. भारती ढाके यांनी निलाताई यांचा परिचय करून देत शिबिराच्या आयोजनामागील भूमिका याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. सौ. भावना चौधरी यांनी योग अणि आरोग्य या विषयी यथार्थ मार्गदर्शन केले. डॉ. सौ भावना चौधरी यांचा परिचय सौ नीलिमा लोखंडे यांनी करून दिला. तसेच त्यानंतर डॉ. ज्योती महाजन यांनीही आपले मनोगत मांडले.

आरोग्य साधकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना असे आरोग्य शिबीर नेहमी आयोजित करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर सारिका पाटील व मनीषा पाटील यांनी योग विषयक अन्य उपयुक्त माहिती सांगितली. संपूर्ण कार्यक्रम हा सूत्रबद्ध रीतीने गुंफत सौ. मनिषा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. व सौ. नेहा तळेले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. योग शिक्षक रोहन चौधरी यांनी सर्व तांत्रिक बाजू सांभाळली. या शिबिरास अत्यंत उत्स्फर्तपणे प्रतिसाद मिळाला.

Protected Content