मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असतांनाच शिवसेनेतील १२ खासदार मोदी सरकारला पाठींबा देणार असल्याचे महत्वाचे विधान वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केले आहे.
विधीमंडळात शिवसेनेत उभी फूट पडली असून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी स्वतंत्र गट करून राज्यात सत्ता संपादन केली आहे. स्वत: शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच अपेक्षित आहे. यासोबत, शिवसेना आणि शिंदे गटातील वर्चस्वाच्या लढाईवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या आधीच शिवसेनेचे वर्ध्यातील खासदार रामदास तडस यांनी शिर्डी येथील कार्यक्रमात बोलतांना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आमदास तडस म्हणाले की, शिवसेनेच्या खासदारांनी मोदी सरकाला पाठींबा द्यावा अशी मानसिकता तयार केलेली आहे. पक्षाच्या १८ पैकी १२ खासदारांनी केंद्र सरकारला पाठींबा देण्याची मानसिकता तयार केली असून याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लक्षणीय बाब म्हणजे आधी हाच विचार अनेक खासदारांनी व्यक्त केला असतांना रामदास तडस यांनी थेट खासदारांचा आकडाच दिला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.