जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव श्री स्वामीनारायण प्राण प्रतिष्ठा महोत्सव अंतर्गत आज दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेला ग्रीनीज बुक ऑफ रेकॉर्ड असे 11000 च्या वर जळगाव परिसरातील सर्व सर्व पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांनी व हरिभक्तांनी हनुमान चालीसा सामूहिकरीत्या एका सुरात पाच वेळेस गायन केले. हे आज पर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड बनले आहे.
जळगाव परिसरातील सर्व शाळा श्री स्वामीनारायण गुरुकुल सावदा भुसावळ येथील विद्यार्थी सकाळी आठ वाजता नाश्ता करून हनुमान चालीसा कार्यक्रमात बसले आणि आणि ज्ञान स्वामी यांनी एका सुरात एकाच वेळेस 11000 पेक्षा जास्त मुलांनी हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात केली असे पाच वेळेस वर्तन केली अत्यंत पवित्र मंगलमय वातावरणात दणदणीत आवाजात हनुमान चालीसा पठण करण्यात आले आजपर्यंत सबंध देशात महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात अशा प्रकारचे पठण इतक्या प्रचंडसंख्येने शालेय विद्यार्थी एकाच व्यासपीठावर बसून हनुमान चालीसा पठण करण्याची ही प्रथमच प्रसंग आहे. त्यानंतर सर्व मुलांना धुळे येथील सोलंकी यांनी जादूचे प्रयोग दाखवून मुलांचे हसून हसून करमणूक व मनोरंजन केले.
तो कार्यक्रम तासभर चालला त्यानंतर सर्व मुलांना भोजन करून आपापल्या शाळेमध्ये व्यवस्थापकांनी बसेची व्यवस्था केली होती. त्याद्वारे पोचवले अशाप्रकारे न भूतो न भविष्यती असा हनुमान चालीसा पठण कार्यक्रम जळगाव सावळ्या मंदिरात संपन्न झाला सदर मुलांना इंग्रजी आणि हिंदी भाषेतून हनुमान चालीसांचे पत्रक देण्यात आली होती याप्रसंगी जळगाव मंदिराचे निर्माण करता परमपूज्य पी पी शास्त्री यांनी अभूतपूर्व अशा प्रकारचा कार्यक्रम झाल्याचे आवर्जून आपल्या मनोगताच व्यक्त केले हनुमान चालीसा म्हणण्याने बल शक्ती आणि उत्साह मिळतो याप्रमाणे हनुमान चालीसाचे महत्त्व त्यांनी सांगितले याप्रसंगी गुरुवर्य परमपूज्य गोविंद स्वामी परमपूज्यनैताम स्वामी वडताल आधी ऐंशीच्यावर संत उपस्थित होते. याप्रसंगी अमेरिकेतील महेश भाई पटेल यांच्या हस्ते 54 फुटी हनुमानजी मूर्तीची प्रतिकृती चे वेदोक्त मंत्र पूजन करण्यात आले व त्यानंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात झाली.