शिवजयंतीनिमित्त दीपनगरला १०५ रक्तदातांनी केले रक्त दान

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे शिवजयंतीनिमित्त उत्सव समिती तर्फे रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 105 रक्तदातांनी रक्त दान केले.या रक्त दान शिबिराचे उद्घाटन सकाळी दहा वाजता मुख्य अभियंता मोहनजी आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तसंकलना साठी शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीला आमंत्रित करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमासाठी उपमुख्य अभियंता सोनकुसरे अधीक्षक अभियंता लाडवंजारी , देशपांडे रविंद्र डांगे,पांढरपट्टे , अतुल पवार, वैद्यकीय अधिक्षक प्रशांत जाधव उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम तसेच सर्व अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. तर रक्तपेढी च्या डॉ.श्रद्धा पैठणकर व त्यांची टिम उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात मुख्य अभियंता मोहनजी आव्हाड साहेबांनी पहिल्या क्रमांकावर रक्तदान करून जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करत 100 पेक्षा जास्त रक्तपिशव्यांचे संकलन झाले पाहिजे असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व अधिक्षक अभियंता व उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. सोबतच सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा आवाहन करुन रक्तदान घडवुन आणले.
मुख्य अभियंता साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकुण १०५ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. पहिल्या नंबरच्या रक्तदात्याचा मान श्री मोहनजी आव्हाड साहेबांना मिळाला तर 100 वे रक्तदाते बाबासाहेब जावळे हे ठरले. तर शिबिराची सांगता १०५ नंबरवर श्री शिवाजी परदेशी यांच्या रक्तदानाने झाली. विशेष म्हणजे आजच्या शिबिरात 3 महिलांनी सुद्धा रक्तदान केले. समीतीचे वतीने सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आली. आज रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांचे समितीचे सचिव श्री संदिप फापाळे यांनी आभार मानत भविष्यातही वेळोवेळी होणऱ्या शिबीरांस आपण सर्वांनी असाच भरभरुन प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले.

Protected Content