यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील उंटावद येथील विविध कार्येकारी सहकारी सोसायटीची ३१ मार्च २०२४ या वर्ष अखेरीस १०० टक्के कर्जाची वसुली करण्यात यश मिळवले आहे.
उंटावद तालुका यावल येथील संस्थेने केलेल्या १०० टक्के कर्ज वसुली बद्दल संस्थेचे चेअरमन शशीकांत गुलाबराव पाटील, जिल्हा बँकेचे विभागीय उप व्यवस्थापक हिरामण नागो महाजन, क्षेत्रीय अधिकारी अरुण टी.तायडे, सचिव संजय दिनकर महाजन व संस्थेचे संचालक मंडळ तसेच किनगाव तालुका यावलच्या विविध कार्येकारी सोसायटीचे चेअरमन व जिल्हा बँकेचे किनगाव शाखा व्यवस्थापक विनोद निळकंठ देशमुख यांचे जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील,कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख,कर्ज वसुली व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे व व्यवस्थापक आर.आर.पाटील यांनी स्वागत करीत संस्थेच्या कारभारींचे अभिनंदन केले आहे.