यावल तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणारे सरपंच सन्मानित

यावल, प्रतिनिधी । कोरोनाच्या महामारी संकटात तालुक्यातील गावपातळीवर चांगले कार्य केलेल्या १४ सरपंच यांना महसुल प्रशासनाच्या वतीने सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले.

यावल येथे आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयातआयोजि सरपंच सत्कार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेन्द्र कुवर हे होते. यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील , निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार तसेच सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष व दहिगावचे उपसरपंच देवीदास धांगो पाटील हे प्रमुख पाहणे म्हणुन उपस्थित होते. . दरम्यान, कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटासमयी ग्रामीण क्षेत्रात ग्राम पंचायत सरपंच यांनी प्रशासनास प्रसंगी गाव विरोध पत्कारून केलेले सहकार्य हे न विसरण्या सारखेच आहे. सरपंचानी दिलेले योगदान उल्लेखनियच असल्याचे मनोगत तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी निलेश पाटील, सरपंच परिषदचे यावल तालुका अध्यक्ष देवीदास धांगो पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केलीत .

आजचे सन्मानार्थी सरपंच
समाधान धनसिंग पाटील ( नावरे ) साजीया सत्तार तडवी ( दहिगाव ) लिलाधर व्ही . पाटील ( नायगाव ), मंजुषा विकास साळुंके ( न्हावी प्र . अ), मनिषा कैलास सपकाळे ( अंजाळे ), जैनुर जमशेर तडवी ( बोरखेडा बु॥ ), लतीत पाटील ( वड्री ), ज्ञानेश्वर रामदास दांडगे ( पाडळसा ), अलकाबाई मधुकर पाटील ( गिरडगाव ), पल्लवी सोनवणे ( बोरखेडा खु॥ ) आणि विलासजवरे ( विरोदाबु॥ ) अशा एकुण १४ सरपंचांचा तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

Protected Content