मुंबई विमानतळावर १० किलो सोने जप्त; कस्टम विभागाची कारवाई

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सातत्याने सोने तस्करीचा पर्दाफाश केला जात आहे. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने तब्बल १० किलो सोने जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कारवाईमध्ये कस्टम विभागाने ९.७६ किलो सोन्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत ६.७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोन्याची तस्करी शॅम्पू बॉटल तसेच रबर शीटमधून सुरू होती. प्रवाशाने गुदद्वारातून सोन्याची तस्करी केल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर कस्टम विभागाने ८८ लाख रुपयांच्या किंमतीचे परदेशी चलन देखील जप्त केले आहे. याप्रकरणी चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची कसून चौकशी सुरु करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

Protected Content