रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रेल्वे ट्रॅकच्या बाजुला शौचालयाला गेलेल्या तरूणाला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील आत्महत्या कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या  बुधवारी रात्री घडली.  या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भावेश मुरलीधर सोनार (वय २८) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

 

हरिविठ्ठल नगर भागात भावेश सोनार हा युवक आपल्या आई, वडिल व मोठ्या भावासह वास्तव्याला होता. बुधवारी १२ जुलै रोजी रात्री घरी आल्यानंतर ९ वाजेच्या सुमारास घरातून शौचालयासाठी निघाला.  रात्री ९.३० वाजेच्या सुमारास आत्महत्या कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅकलगत रेल्वेचा धक्का लागल्याने भावेशचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या काही युवकांनी रात्री पोलीसांना दिली. हरिविठ्ठल नगरातील काही युवकांनी मृतदेह पाहिल्यानंतर भावेशची ओळख पटल्यानंतर भावेशच्या नातेवाईकांनी माहिती देण्यात आली.  भावेशच्या मृतदेहावर शवविच्छेदण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content