भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील निंभोरे खुर्द येथे चोरीचे भंगाराचा माल विकत घेतला असा बहाणा करून चाकूचा धाक दाखवत तरूणाला चाकूचा धाक दाखवून वडीलांना ठार मारण्याची धमकी देत १ लाख रूपये जबरी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवारी १४ नव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तीन जणांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फरीद रशिद पिंजारी वय ३५ रा. निंभोरे खुर्द हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता संशयित आरोपी राजकुमार उर्फ राज रविंद्र खरात रा.भुसावळ आणि त्याच्या सोबत असलेले दोन अनोळखी व्यक्ती हे फरीदच्या घरी आले. त्यांच्या साईटवरील चोरीचे भांगारचा माल विकत घेतला असा बहाणा करून नातेवाईकांना झोपेतून उठवून तरूणाचा चाकूचा धाक दाखवत तुझ्या वडीलांना जिवंत ठार मारेल अशी धमकी देत ३ लाखांची मागणी केली. त्यानंतर तरूणाच्या किरणा दुकानातील १ लाख रूपये रोख रक्कम हिसकावून पसार झाले. दरम्यान तरूणाने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता राजकुमार उर्फ राज रविंद्र खरात रा.भुसावळ आणि त्याच्या सोबत असलेले दोन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे हे करीत आहे.