जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आव्हाणे शिवारातील कन्ट्रक्शन व्यावसायिकाची तब्बल १ कोटी रुपयात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी दोन जणांविरोधात गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील आव्हाणे शिवारात भाऊसाहेब भाऊराव पाटील वय ५२ हे वास्तव्यास आहेत. हे कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आहेत. जळगावातील विवेकानंद नगरातील नंदु सुदाम बोरसे व दिपक सुदाम बोरसे या दोन्ही भावंडांनी भाऊसाहेब पाटील यांची भेट घेतली, खोट्या व बनावट फर्मची कागदपत्रे दाखवून भाऊसाहेब पाटील यांचा विश्वास संपादन केला तसेच जास्त रकमेचा मोबदला मिळेल म्हणून दोघांनी भाऊसाहेब पाटील यांच्याकडून ९ मार्च २०२३ ते १८ जुलै २०२३ या दरम्यानच्या काळात तब्बल वेळोवेळी १ कोटी रुपये घेतले, आपल्याला दाखवलेली कागदपत्र ही खोटी तसेच फर्म ही खोटी असल्याचे समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची भाऊसाहेब पाटील यांना खात्री झाली, त्यांनी दोघांकडे पैसे परत मिळावे म्हणून मागणी केली, मात्र संबंधित दोघा भावंडांनी रक्कम परत केली नाही, अखेर याबाबत भाऊसाहेब पाटील यांनी गुरुवारी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन नंदु सुदाम बोरसे व दिपक सुदाम बोरसे दोन्ही रा, विवेकानंद नगर, जळगाव ह.मु भुज कच्छ, गुजरात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनंत अहिरे हे करीत आहेत.