चाळीसगावात दीड लाखांचा गुटखा पकडला

चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातून अवैधरित्या गुटखा व पानमसाला यांची वाहतूक करणारी कार चाळीसगाव शहर पोलीसांनी पकडली आहे.  यात कार व गुटखा सह एकुण ४ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देपाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकराी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातून अवैधरित्या घोटका वाहतूक व होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.  त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पथकाने कारवाई करत कार क्रमांक  एमएच ४३ एक्स  ५२५६) ही अडविली. त्यानंतर तिची चौकशी केली असता त्यामध्ये १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे गुटखा, पान मसाला मिळून आला. दरम्यान पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला.  याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालक याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल टाकले करीत आहे.

Protected Content