नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या संकटामुळं फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये जीएसटीतून मिळणारा महसूल १,०५,१५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा यंदा जीएसटीतून मिळालेला महसूल दहा पट जास्त आहे.
“ऑक्टोबर २०२० मध्ये एकूण जीएसटीचा महसूल १,०५,१५५ कोटी रुपये राहिला. यामध्ये केंद्रीय जीएसटी १९,१९३ कोटी रुपये तर राज्यांचा जीएसटी २५,४११ कोटी रुपये आहे. एकत्रित जीएसटी ५२,५४० कोटी रुपये आहे. (आयातीतून मिळालेल्या २३,३७५ कोटी रुपयांसह) उपकर ८,०११ कोटी रुपये आहे. (आयातीतुन आलेल्या एकत्रित ९३२ कोटी रुपयांसह)”
ऑक्टोबर २०२० मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये जीएसटी संकलन ९५,३७९ कोटी रुपये राहिला. अर्थ मंत्रालयानं सांगितलं की, “३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत दाखल करण्यात आलेल्या एकूण जीएसटी आर-३ बी रिटर्नची संख्या देखील ८० लाखांवर पोहोचली आहे.”