रावेर : प्रतिनिधी । ६ हजार रुपयांची वाळू आणि २ ट्रॅक्टर जप्त करून अवैध वाहतूक करणाऱ्या २ ट्रॅक्टर चालकाना पोलिसांनी अटक केली आहे
ट्रॅक्टर चालकाविरोधात रावेर पोल्स ठाण्यात .गु.र.न.223/2020 भा.द.वी.कलम 379,गौण खनिज कायदा क 48 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे
पो. कॉ सुरेश मेढे या गुन्ह्यात फिर्यादी आहेत . आरोपी ट्रक्टरचालक शेख सलमान शेख हसन ( वय 21 रा.ईमामवाडा रावेर ) याला १ डिसेंबररोजी रात्री रात्री दीड वाजता रावेर शहरात आंबेडकर चौकात अटक करण्यात आली
दुसऱ्या गुन्ह्यात ट्रॅक्टर चालक मनोज कोळी (वय 30 रा.आटवडे रावेर) याला अटक करून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर आणि ३ हजार रुपये किमतीची वाळू जप्त करण्यात आली . या गुन्हयात पो. कॉ उमेश नरवाडे फिर्यादी आहेत पुढील तपास अनुक्रमे पो.ना महेंद्र सुरवाडे व ए एस आय इस्माईल शेख हे करीत आहेत