अल्पवयीन तरुणीला पळवून नेणाऱ्या तरुणास बाजार पेठ पोलिसांनी केली अटक

 

भुसावळ, प्रतिनिधी । एक अल्पवयीन तरुणी कॉलेजला जाते असे सांगून घरातून गेली होती. परंतु, ती घरी न आल्याने तिच्या आईच्या फिर्यादीनुसार बाजार पेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. यानुसार पोलिसांनी तपास करत तरुणी व एकाला बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले असून त्या तरुणावर पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथील हनुमान नगर मधील एक महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणी सोमवार २ मार्च रोजी घरी कॉलेजला जाते असे सांगून गेली होती. परंतु, ती कॉलेजमधून घरी न आल्याने तिच्या आई व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती त्यांना मिळून आली नाही. तरुणीच्या आईने या संदर्भात बाजार पेठ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी मिळालेल्या मोबाईल सी.डी.आर. लोकेशन वरुन पथक तयार करुन बुलढाणा जिल्ह्यातील साखर खेडा येथे पाठविले. पथकाने तेथून अल्पवयीन तरुणी व यातील आरोपी मंगेश अंबादास काळे (वय २२ रा.कृष्णा नगर भुसावळ) यांना ताब्यात घेवुन पो स्टेशन भुसावळला आणले व पुढील तपास वरुन सदर गुन्ह्यात पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर आरोपी विरुध्द याचे आगोदर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डाॅ.पंजाबराव उगले , अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके , उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौज तस्लिम पठाण, पो.हे.काॅ जयराम खोडपे, पो.ना.चंद्रकांत बोदडे, दिपक जाधक, म.पो.काॅ.संगिता चौधरी यांनी केली.

Protected Content