६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी ; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) मनोरंजन क्षेत्रात काम करणार्‍या ६५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना मुंबई उच्च न्यायालयाने मालिका-चित्रपटाच्या सेटवर काम करण्याची परवानगी दिली आहे. हायकोर्टाने ठाकरे सरकारचा आदेश रद्द ठरविला आहे.

 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ६५ वर्षांवरील चित्रपट, टीव्ही कलाकार आणि क्रू मेंबर्सना स्टुडिओ किंवा आऊटडोअर सेटवर काम करण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. मात्र सरकारने जारी केलेले दोन ठराव मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. तर ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी लागू असलेल्या इतर सर्व नियमावली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या पासष्टीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांनाही लागू असतील, असेही न्यायमूर्ती एस. जे. काठावाला आणि आर. आय. चगला यांच्या खंडपीठाने सांगितले. दरम्यान, अनेक कलाकारांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती.

Protected Content