जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शिंदे सरकारला आज १०० दिवस पूर्ण होत असल्याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांनी पन्नास खोके, शंभर दिवस ओके हे अनोखे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील चौकात शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता शिंदे सरकारवर निशाना साधून विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी “५० खोके… १०० दिवस… ओके ओके” अशी जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
महाविकास आघाडीचे सरकार असतांना मंत्रीमंडळात अनेक निर्णय घेण्यात आले होते. तसे जी.आर. देखील प्रसिध्द करण्यात आले होते. परंतू एकनाथ शिंदे यांनी इतर आमदारांसह बंडखोरी करून भाजपला सोबत घेवून राज्यात नव्याने सत्ता स्थापन केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांचे जी.आर. रद्द करून विकास कामांना स्थगिती दिली आहे. तसेच शिंदे सरकार स्थापन होवून आज १०० दिवस झाले परंतू शिंदे सरकारने दिलेले आश्वासन अद्यापपर्यत पाळलेले नाही. आणि नवीन जी. आर. काढले. याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील चौकात नव्याने काढलेल्या जी.आर.ची होळी करून ५० खोके.. १०० दिवस ओके ओके अशी जोरदार घोषणाबाजी करत शिंदे सरकारचा निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शहराध्यक्ष शरद तायडे, शिवसेना महिला आघाडीच्या मंगला बारी, पुनम राजपूत, प्रशांत सुरळकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या महानराध्यक्षा मंगला पाटील, युवक आघाडीचे उपाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/394463209568985