४१२ कोटींचा ऑनलाईन अपहार करण्याचा प्रयत्न फसला; रॅकेट उद्ध्वस्त

जळगाव जितेंद्र कोतवाल । एटीएम कार्डधारकांचा डाटा जमा करून या माध्यमातून तब्बल ४१२ कोटी रूपयांचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न आज रामानंदनगर पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि , सायवर क्राईमबाबत सखोल ज्ञान असणारा म्हणुन मला मनिष भंगाळे (रा. राकापार्क ) परीचित आहे. सायवर क्राईमबाबत आम्ही मनिष व त्याचा मित्र गौरव पाटील यांची मदत घेत असतो. दोन महिन्यांपूर्वी मला मनिष भंगाळे याने त्यास काही लोक विविध बँकांच्या खात्यांचे डिटेल्स पाठवुन त्यातुन मी ऑनलाईन पध्दतीने त्यांना पैसे काढुन दयावेत यावाबत दवाव टाकत असल्याबाबत सांगितले होते मनीष व गौरव मला 01 ऑक्टोबररोजी भेटल्यावर त्यांनी माझ्याशी, त्याला बैंक अकाऊंट तसेच डेबीट व क्रेडिट कार्डाची माहिती देतुन काही लोक त्यातुन ऑनलाईन मनी ट्रान्सफर करण्यास सांगत असल्याचे पुन्हा सांगुन मनिषने त्याचेक्डील मोबाईल मध्ये त्याला आलेल्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांचे डिटेल्स व काही खात्यांचे कॉम्युटर स्क्रिनचे स्क्रिनशॉट दाखविले. त्यात खातेदारांची इत्यंभुत माहिती होती. काही क्रेडीट व डेवीट कार्डाच्यादोन्ही बाजुकडील फोटो प्रतीदेखील दाखविल्या. मी त्या मोबाईलमधील खात्यांचे स्क्रीनशॉट, खात्यांची माहिती व क्रेडिट, डेवीट कार्डाच्या दोन्ही बाजुकडील फोटो प्रती वारकाईने पाहिल्या. त्यानंतर काही बैंकांत जावुन मिळविलेल्या माहितीत मला बैंकेच्या खात्यांचे स्क्रिनशॉट व खात्याची माहिती खातेदाराव्यतिरीक्त इतरांना मिळ शकत नसल्याबाबत समजले. या क्रेडिट, डेबीट कार्डाच्या क्रमांकासह गोपनीय सीव्हीव्ही नंबर व वैधता संपण्याची मुदत असलेल्या प्रती देखील चोरटया मार्गाशिवाय उपलब्ध होऊच शकत नसल्याबाबत माहिती मिळाली. अशी माहिती ऐनकेन प्रकारे चोरटया मार्गाने घेवुन काही लोकांनी त्यावेकडे ऑनलाईन पैसे काढुन घेण्यासाठी पाठवित्याचे मनिष याने सांगितले. होते मला मिळालेली माहिती व मनिष याचे मोबाईल मधील माहिती व स्क्रिनशॉट पाहुन ऑनलाईन फसवणुक करुन मनी ट्रान्सफर करणारे हे रेंकेट असल्याची मला जाणीव झाली मनिष याने देखील त्यास दुजोरा दिला काही लोक दबाव आणुन व आमिष दाखवुन असे कृत्य करण्यास प्रवृत्त करत असल्याचे त्याने सांगितले. तो ऑनलाईन फसवणुक करून मनी ट्रान्सफर करण्यास इच्छुक नसल्याचे त्याने सांगितले. या रेंकेटवा पर्दाफाश करून फसवणुक होवु न देण्याचे मी, मनिष व गौरव यांच्यात ठरले व त्यांनी शक्य तेवढी मदत करण्याचे मान्य केले. ऐकमेकाच्या संपर्कात राहण्याचे आमच्यात ठरले होते.

त्यानुसार मनिषने त्यास जळगाव येथील आरोपी हेमंत पाटील वेळोवेळी मॅसेज करून त्यास ऑनलाईन मनी ट्रॅन्झेक्शन करण्याबाबत गळ घालत असल्याचे व ते काम करून देण्याच्या मोवदल्यात 20 टक्के देणार असल्याचेदेखील सांगितले होते. मनीषला गुजरातेतील चिखली आणि नाशिक येथे जाण्यास आणि संशयित आरोपींना भेटण्यास दबावातून भाग पाडले गेले होते नाशकातील एक बँकेचा व्यवस्थापकही या रॅकेटमध्ये सहभागी होण्यास तयार झाला होता . त्यानंतर पोलिसांनी १५ ऑक्टोबररोजी रात्री सापळा रचून काही खात्यांवर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचे प्रात्यक्षिक मनीष भंगाळेकडून करून घेतले होते . हे पैसे ट्रान्स्फर होत असताना पोलिसांनी छापा टाकुन मनिषशी चर्चा करीत असलेले हेमंत पाटील व मोहसीन खान इस्माईल खान यांना त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (क्र एमएच 19 डी इ 530,) , दोन मोबाईलसह ताब्यात घेतले.

चौकशीनंतर त्यांनी टोळीबद्दल माहिती पोलिसांना दिली. या टोळीने बँक खात्यांची माहिती कशी संकलित केली हे पोलिसांच्या पुढच्या तपासात स्पष्ट होणार आहे प्रत्यक्ष फसवणूक आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी त्यांना मनिष भंगाळे यांच्या मदतीची गरज होती या गुन्ह्यातील बाकीच्या ६ आरोपींचा शोध पोलीस घेत आहे या सर्व आरोपींविरुद्ध भा द वि कलम ४२०, ४०९ आणि १२० ( ब ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे .

यांनी केली कारवाई
दोन्ही आरोपीकडून गुन्ह्यातील कागदपत्रे हस्तगत केले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पोहेकॉ सतिश डोलारे, पो.ना. विनोद सोनवणे, शिवाजी धुमाळ, जयंत कुमावत, जितेंद्र तावडे, पो.कॉ. संतोष गिते या पथकाने कारवाई केली. पुढील तपास अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंथा हे करीत आहे.

Protected Content